मुंबई मराठी पत्रकार संघ
Mumbai Marathi Patrakar Sangh
Contact Us

022-22620451| 022-22700715

mmps.president@gmail.com
इतिहास
मराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे

ब्रिटिश राजवटीने चालविलेल्या दडपशाहीविरुद्ध टोकदार लेखण्या झिजविणारे मराठी पत्रकार, आपल्या जळजळीत लिखाणाने जनतेला परकी राजवटीविरुद्ध उठाव करण्यास उद्युक्त करीत होते. त्यासाठी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन करीत होते, काँग्रेससारखी प्रभावी संघटनेची शक्ती वाढावी म्हणून आपल्या लेखण्या झिजवीत होते.

पण आपल्यावर होणा-या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी संघटित होण्याची कल्पनाही त्यांना सुचली नाही असे आढळून येते. अशी संघटना निर्माण होण्यासाठी दुसरे महायुद्ध सुरू व्हावे लागले. दुसर्या महायुद्धात ब्रिटिशांनी हिंदुस्तानाला ओढले आणि मराठी पत्रकारांना आपली संघटना उभारण्याची गरज भासू लागली.

दुसरे जागतिक महायुद्ध १९३९ मध्ये सुरू झाले. ब्रिटन या युद्धात उतरले. आपण हिंदुस्तानासह या महायुद्धात सहभागी होत आहोत अशी घोषणा ब्रिटिश सरकारने केली. त्यावेळी हिंदुस्तानात १९३५ च्या कायद्यानुसार सात प्रांतात काँग्रेसची सरकारे सत्तेवर होती. परंतु सदर सरकारांशी विचारविनिमय न करताच ब्रिटिश सरकारने हिंदुस्तानला युद्धात खेचले. याचा अर्थ ब्रिटिश सरकारने हिंदुस्तानला दिलेली स्वायत्तता ही केवळ दिखावू होती. भारतातील सात प्रांतीत सरकारांचे काय म्हणणे आहे हे ऐकण्याचीही गरज ब्रिटिश सरकारला वाटली नाही. ब्रिटिशांनी आपल्याशी विचारविनिमय न करताच भारताविषयी परस्पर निर्णय घेतला या गोष्टीच्या निषेधार्थ सात प्रांतीय सरकारांनी राजीनामे दिले. आणि ब्रिटिशांची दिखावू प्रांतिक स्वायत्तता संपुष्टात आणली.

ब्रिटनमध्ये जरी लोकशाही असली तरी ब्रिटन युद्धात पडल्यानंतर या लोकशाही सरकारला युद्ध परिस्थितीत सर्वाधिकार आपल्या हाती असले पाहिजेत असे वाटणे स्वाभाविक होते. विशेषत: ज्या देशांवर ब्रिटिशांची सत्ता होती तेथील आपल्या अधिकार्‍यांना सर्वाधिकार देण्याची गरज ब्रिटिश सरकारला वाटली. त्याप्रमाणे ब्रिटिश सरकारने आपल्या अधिकार्यां ना सर्वाधिकार दिले. काँग्रेस सरकारांनी राजीनामे दिल्यामुळे हिंदुस्तानातील ब्रिटिश अधिकार्यांाना मिळालेले अधिकार निरंकुश झाले.

वृत्तपत्रांचे महत्त्व किती आहे याची ब्रिटिश सरकारला जाणीव होती. हिंदुस्तानातील देशी वृत्तपत्रांना नियमाच्या साखळ्यांनी जखडून टाकणे आवश्यक असल्याचे ब्रिटिश सत्ताधार्यांणच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वृत्तपत्र लिखाणावर अनेक बंधने घातली.

शितावरून भाताची परीक्षा करण्यात कुशल असलेल्या मराठी पत्रकारांनी भावी काळात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे त्याचा अंदाज बांधला. या येणार्या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे याचा वृत्तपत्रे व पत्रकार स्वतंत्रपणे आणि गटागटाने विचार करू लागले.

युद्ध परिस्थिती आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य, तद्नुषंगाने वृत्तपत्रांपुढे निर्माण होणारे अनेक प्रश्न यांचा सामायिकपणे विचार केला पाहिजे ही भावना पत्रकारांमध्ये रुजली व दृढ होऊ लागली. मुंबईतील पत्रकार एकत्र जमले व या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व मराठी पत्रकारांना व मराठी वृत्तपत्र व्यवसायिकांना एकत्र आणण्याची गरज असल्याचे त्यांना जाणवले.

पत्रकारांनी व व्यावसायिकांनी जे काय म्हणावयाचे ते एकत्रितपणे व संघटितपणे मांडावे ही भूमिका सर्वांनाच पटली. तेव्हा मुंबईच्या पत्रकारांनी महाराष्ट्रातील मराठी पत्रकारांचे एक संमेलन मुंबईत बोलाविले. या संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून नाही परंतु मुंबईखेरीज पुण्याचे बरेच पत्रकार हजर होते.

इंग्रज राज्यकर्त्यांनी, वृत्तपत्रांनी काय लिहावे, कसे लिहावे व काय लिहू नये याचा फतवा काढला. या फतव्याची कशी वासलात लावायची याचा विचार पत्रकार संमेलनात झाला. सर्व मराठी पत्रकारांनी एकत्र येऊन पाऊल उचलण्याची गरज या संमेलनात व्यक्त करण्यात आली व त्या दृष्टीने कृतीही सुरू झाली.

अशा कृतीसाठी सर्वसमावेशक, प्रातिनिधिक व एकजिनसी अधिष्ठान प्राप्त झाले पाहिजे म्हणून जे काही करायचे वा म्हणायचे असेल ते सर्व मराठी पत्रकारांनी एकत्र बसून, एकत्रित व संघटितपणे विचार करून ठरवावे व जे ठरेल त्याप्रमाणे वागावे असा निर्णय झाला. जी कृती करावयाची ती परिणामकारक होण्यासाठी संघटनेला अधिकार असला पाहिजे, त्यासाठी संघटनेची शक्ती वाढविली पाहिजे हा विचार प्रभावी झाला. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्व मराठी पत्रकारांची एक बैठक बोलाविण्याचे ठरले.

मुंबईतील विठ्ठलभाई पटेल रोडवर, ख्रिश्चन मिशन-यांनी चालविलेल्या विल्सन हायस्कूलचे पटांगण मोठे होते. तिथे मंडप घालून त्या मंडपात डिसेंबर १९३९ मध्ये मुंबई आणि उपनगर साहित्य संमेलन भरले होते. हे संमेलन संपल्यानंतर त्याच मंडपात मराठी पत्रकारांचे पहिले संमेलन भरले.

या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पुण्याच्या ज्ञानप्रकाश चे संपादक कृष्णाजी गणेश लिमये होते. स्वागताध्यक्ष मुंबईच्या नवाकाळ दैनिकाचे संपादक य. कृ. खाडिलकर होते. या संमेलनात युद्धजन्य परिस्थितीत वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच करणारे कायदे, निर्बंध वगैरे विषयांवर प्रामुख्याने विचार विनिमय झाला.

महाराष्ट्रातील सर्व मराठी पत्रकारांनी या संमेलनाला येऊन आपले विचार मांडावे अशी अपेक्षा होती. परंतु मुंबईखेरीज पुण्याचे काही पत्रकार आले. महाराष्ट्राच्या इतर भागातील मराठी पत्रकारांनी मोठी निराशा केली. जमलेल्या पत्रकारांनी वृत्तपत्रांवरील निर्बंध व संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या संमेलनात असेही ठरले की, या सर्व कार्यासाठी स्थायी स्वरूपाची व कायमची संघटना असावी, तरच कार्यात सातत्य राहील. म्हणून पत्रकार संघाची स्थापना झाली. संघाला स्थायी स्वरूप द्यायचे तर दैनंदिन कार्याला मार्गदर्शन करणारी घटना हवी. ती तयार करण्यात आली आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचा जन्म झाला. पत्रकार संघाच्या स्थापनेची सभा लोकमान्य दैनिकाच्या कार्यालयात २१ जून १९४१ रोजी झाली.

मुंबईचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून पुण्यातील मराठी पत्रकारांनीही आपला संघ स्थापन केला आणि महाराष्ट्रातील मराठी पत्रकारांचे दुसरे संमेलन पुण्यात बोलाविले. त्याचे अध्यक्षस्थान प्रा. न. र. फाटक यांनी भूषविले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या स्थापनेआधी सात दिवस देशी भाषा वृत्तपत्रांची अखिल भारतीय पातळीवरील संघटना स्थापन झाली. या संघटनेचे दरवाजे देशी भाषांतील वृत्तपत्रांना खुले होते, परंतु त्या काळात फार थोडीच वृत्तपत्रे या संघटनेत सामील झाली. ही संघटना प्रामुख्याने व्यवस्थापनांची होती. त्यामुळे या संघटनेत प्रामुख्याने व्यवस्थापनांचे प्रतिनिधी असत.

व्यवस्थापनांच्या प्रश्नांची यात चर्चा होत असे. युद्धकाळात छपाईच्या कागदाची टंचाई भासू लागली. हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ही संघटना स्थापन होऊन सदर संघटनेचे पहिले शिष्टमंडळ सरकारकडे गेले ते छपाईच्या कागदाच्या टंचाईचा प्रश्न घेऊन. त्यानंतर सरकारी जाहिराती, पृष्ठ किंमत कोष्टक यांसारख्या प्रश्नांवर संघटनेने प्रयत्नन केलेले दिसतात.

पत्रकारांना प्रशिक्षण असा जरी उद्देश संघटनेच्या घटनेत असला तरी त्या दृष्टीने काही काम झालेले दिसत नाही. इंडियन न्यूजपेपर सोसायटी (इंडियन अँड ईस्टर्न न्यूजपेपर सोसायटी हे जुने नाव) ही पण व्यवस्थापनांचीच संघटना आहे व ती फार जुनी आहे.

बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्ट म्हणजे श्रमिक पत्रकारांची संघटना. तिची स्थापना १९३१-३२च्या सुमारास झाली. पण त्यावेळी त्या संघटनेचे नाव होते इंडियन जर्नालिस्टस् युनियन. या संघटनेत प्रामुख्याने इंग्रजी पत्रकार होते. व त्यांचीच ही संघटना आहे असे भासत होते. तिला श्रमिक पत्रकार संघटनेचे स्वरूप आल्यावर त्यांत सर्व भाषांतील श्रमिक पत्रकार सामील झाले.

मुंबई मराठी पत्रकार संघाची पहिली घटना १९४१ मध्ये तयार करण्यात आली, त्यात पत्रकार कोणास म्हणावे व संघटनेत कोणाला प्रवेश द्यावा हे स्पष्ट केलेले आहे. त्यात पत्रकारिता हा ज्याचा मुख्य व्यवसाय आहे तोच संघाचा सभासद होऊ शकतो. जो वृत्तपत्रांत लिहितो तो पत्रकार असेच व्यवहारात तत्व मानून संघ सदस्यत्व दिलेले दिसते.

व्यवस्थापन मंडळ
विविध पुरस्कार